विशेष बातम्या

'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चा टीझर रिलीज होताच शाहरुखनं करण जोहरसाठी केलं खास ट्वीट

As soon as the teaser of Rocky Aur Rani Ki Prem Kahani was released Shah Rukh made a special tweet for Karan Johar


By nisha patil - 6/20/2023 5:24:42 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम  करण जोहरच्या  धर्मा प्रोडक्शन या चित्रपट निर्मिती कंपनीच्या माध्यमातून अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली गेली आहे. गेली 25 वर्ष करण हा फिल्ममेकर म्हणून चित्रपटसृष्टीत काम करत आहे. करणचा रॉकी और रानी की प्रेम कहानी  हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाचा टीझर रिलीज होताच शाहरुख खाननं एक खास ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यानं करण जोहरचं कौतुक केलं आहे आणि रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
शाहरुखनं ट्वीटमध्ये लिहिलं,  ' WOW करण, फिल्ममेकर म्हणून तू गेली 25 वर्षे काम करत आहेस. तू या क्षेत्रात खूप पुढे आला आहेस! तुझे वडील आणि माझे मित्र टॉम अंकल हे स्वर्गातून पाहत असतील आणि त्यांना खूप आनंद आणि अभिमान वाटत असेल. मी तुला नेहमी सांगितलं आहे की, अधिकाधिक चित्रपट तयार करत राहा कारण आपल्याला प्रेमाची जादू हवी आहे… जी फक्त तुच करू शकतो. रॉकी और रानी की प्रेम कहानीचा टीझर खूप छान आहे. चित्रपटाच्या टीमला माझ्याकडून शुभेच्छा'


'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चा टीझर रिलीज होताच शाहरुखनं करण जोहरसाठी केलं खास ट्वीट