बातम्या

राज्यात कोरोना रुग्णांचा आलेख चढताच, जेएन1 व्हेरियंटचेही रुग्ण वाढले, ठाण्यात सर्वाधिक रुग्ण

As the graph of corona patients climbed in the state patients of JN1 variant also increased


By nisha patil - 12/25/2023 6:58:41 PM
Share This News:



राज्यात कोरोना रुग्णांचा आलेख चढताच, जेएन1 व्हेरियंटचेही रुग्ण वाढले, ठाण्यात सर्वाधिक रुग्ण

जेएन1 व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळले. त्यामुळे चिंता वाढली आहे. आरोग्य विभाग आणि डॉक्टरांनी खबरदारी घेण्याचे आव्हान केलेय. 
 

राज्यातील कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढताना दिसते आहे. राज्यात काल नव्याने 50 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. सोबतच, जेएन 1 व्हेरीयंटच्या रुग्णांची संख्या 10 वर जाऊन पोहोचली आहे. एकीकडे सणांचे दिवस असताना वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरते आहे. 
रा

24 डिसेंबर अखेर राज्यातली एकूण ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 153 वर जाऊन पोहोचली आहे
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं दिसतं आहे. एका महिन्याआधी कोरोना संपूर्णपणे बाजूला होईल असं चित्र आकडेवारीवरुन दिसत होतं. मात्र, जेएन १ व्हेरीयंटचा शिरकाव देशात झाल्यानंतर पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलं. एकीकडे रुग्णसंख्या वाढत जरी असली तरी कोरोनामुळे होणारे मृत्यू खूप कमी आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत जरी असली तरी झालेलं मोठ्या प्रमाणात लसीकरणाचा फायदा देखील होताना दिसतोय. मात्र, जेष्ठ नागरिक असतील किंवा इतर व्याधी असलेल्यांना सतर्क राहण्याची गरज आहे. 


राज्यात कोरोना रुग्णांचा आलेख चढताच, जेएन1 व्हेरियंटचेही रुग्ण वाढले, ठाण्यात सर्वाधिक रुग्ण