बातम्या

जसा जसा काळ पुढं पुढं जातो

As time goes on


By nisha patil - 3/11/2023 7:12:39 AM
Share This News:



जसा जसा काळ पुढं पुढं जातो,
नकळत आपण ही बदलत असतो,
बदल कधी नक्की घडला सांगता नाही येत,आपणही ते कधी मनावर नाही घेत,
पण काळच शिकवतो, रीत जगाची,
शिकवण देतो, कुठं न कशी वागायची,
सुरवातीला मन धजत नसतं, काळानुसार वागायला,
पण नंतर ते ही बेडर होतं, न लागतं ते  करायला,
सगळेच म्हणतात तू आधी अशी नव्हती वागत,
पण आलेले अनुभव, तेच असतात न सोबत!मागे वळून बघितलं की आपल्यास ही समजतं,
कोण होतो आपण अन काय झालो, तेही कळतं!


जसा जसा काळ पुढं पुढं जातो