बातम्या
पंतप्रधानांच्या चित्ता प्रकल्पाला मोठे यश; कुनो राष्ट्रीय उद्यानातील ‘आशा’ने ३ बछड्यांना दिला जन्म,
By nisha patil - 4/1/2024 7:34:11 PM
Share This News:
भोपाळ : कुनो राष्ट्रीय उद्यानातील चित्त्यांची संख्या वाढली आहे. मादी चित्ता आशाने तीन बछड्यांना जन्म दिला आहे. यामुळे चित्त्यांची एकूण संख्या १८ झाली आहे.
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानातून खुशखबर आली आहे. येथील मादी चित्ता आशाने तीन पिल्ल्यांना जन्म दिला आहे. तिन्ही बछडे स्वस्थअसल्याचे सांगितले जात आहे. कुनो नॅशनल पार्कमध्ये १७ सप्टेंबर २०२२ रोजी दक्षिण आफ्रिकेतून ८ चित्ते आणले होते. मादी चित्ता त्यातील एक आहे. आता येथे चित्त्यांची एकूण संख्या १८ झाली आहे. केंद्रीय
पर्यावरण मंत्री भूपेंद्र सिंह यांनी कूनो राष्ट्रीय उद्यान जन्मलेल्या तीन बछ्ड्यांचा व्हिडिओ शेअर केले करत ही माहिती दिली आहे.
भूपेंद्र यादव यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, जंगलमध्ये म्याऊँ.. मला हे सांगताना आनंद होत आहे की, कुनो नॅशनल पार्कने तीन नव्या सदस्यांचे स्वागत केले आहे. नामीबियातून आलेल्या मादी चित्ता आशाने तीन बछड्यांना जन्म दिला आहे. त्यांनी चित्ता प्रोजेक्टला मोठे यश मिळाल्याचे सांगत पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे.
कुनो राष्ट्रीय पार्कमध्ये सध्या १३ चित्ता व एक बछडा आहे. आता तीन नव्या बछड्यांची भर पडल्याने एकूण चित्त्यांची संख्या १८ झाली आहे. यापैकी ७ नर चित्ते गौरव, शौर्य, वायु,अग्नि, पवन, प्रभाष आणि पावक आहेत. तसेच ७ मादी चित्तांमध्ये आशा, गामिनी, नाभा, धीरा, ज्वाला, निरवा आणि वीरा आदिंचा समावेश आहे. यापैकी केवळ दोन चित्ते जंगलात सोडले आहेत. जे येथे येणाऱ्या पर्यटकांना दिसू शकतात. अन्य चित्ते मोठ्या पिंजऱ्यात बंद आहेत. भारतात चित्ता प्रोजेक्ट अंतर्गत नामीबियातून ८ चित्त्यांना आणले गेले होते. त्यानंतर १८ फेब्रुवारी २०२३ रोजी दक्षिण आफ्रिकेतून १२ आणखी चित्त्यांना कुनोमध्ये सोडले गेले. कुनोमध्ये आतापर्यंत ६ चित्त्यांचा मृत्यू झाला आहे.
पंतप्रधानांच्या चित्ता प्रकल्पाला मोठे यश; कुनो राष्ट्रीय उद्यानातील ‘आशा’ने ३ बछड्यांना दिला जन्म,
|