बातम्या

कुंभोज गावच्या शिरपेच्यात मानाचा तुरा अश्फाक मुजावर यांना लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार २०२३

Ashfaq Mujawar the proud leader of Kumbhoj village was awarded the Lokraja Rajarshi Shahu Gaurav Award 2023


By nisha patil - 6/23/2023 10:50:41 PM
Share This News:



 कुंभोज प्रतिनिधी ( विनोद शिंगे)   कुंभोज तालुका हातकलंगले येथील  अश्फाक महंम्मद फारूख मुजावर सिनिअर आर्टिफिशियल लिफ्ट कमिशनिंग इंजिनिअर, बेकर हुस कंपनी, ओमान यांना अविष्कार फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय लोकराजा राजश्री शाहू गौरव पुरस्कार जाहीर झाला असून सदर पुरस्काराचे वितरण कोल्हापूर येथे अविष्कार फाउंडेशनचे अध्यक्ष संजय पवार व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. अश्फाक मुजावर यांच्या पुरस्काराने कुंभोज च्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला गेला असून त्यांचे अनेक स्तरातून अभिनंदन होत आहे. सध्या अश्फाक मुजावर हे अभियंता म्हणून ओमान येथे करीत असलेल्या विशेष कामाची नोंद घेऊन २०२३ चा राज्यस्तरीय " लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार " त्यांची निवड करण्यात आली आहे.
         आविष्कार फौडेशन ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य, सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारी संस्था आहे. गेल्या १६ वर्षापासून समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेले आणि करीत असलेल्या व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करणे आणि गरजूंना विविध प्रकारची मदत करणे यासाठी संस्था कार्यरत आहे. प्रतिवर्षाप्रमाणे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने " लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार " कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.


कुंभोज गावच्या शिरपेच्यात मानाचा तुरा अश्फाक मुजावर यांना लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार २०२३