बातम्या

कौतुकास्पद! नीट परीक्षेत नाशिकचा आशिष भराडीया दिव्यांगांमध्ये प्रथम

Ashish Bharadia of Nashik stands first  NEET examination


By nisha patil - 6/16/2023 7:43:10 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम  वैद्यकीय शाखेच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या  महिन्यात घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत आशिष भराडीया हा विद्यार्थी दिव्यांगामध्ये देशात प्रथम आला आहे.तर जनरल कॅटेगिरीमध्ये देशात त्याचा 722 रँक आला आहे. या यशाचे नाशिकसह जिल्हाभरात कौतुक होत आहे.  मे महिन्यात घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून या परीक्षेत आशिष भराडीया हा विद्यार्थी अपंगांमध्ये देशात प्रथम आला. आशिष हा नाशिक येथील सुप्रसिध्द बालरोग तज्ज्ञ डॉ. मिलिंद भराडीया आणि डॉ. वैशाली भराडीया यांचा मुलगा आहे.

दिव्यांगावर मात करत देशात पहिला क्रमांक आशिष ने मिळवला आहे
नीट परीक्षेला यावर्षी देशभरातून 21 लाख विद्यार्थी बसले होते. देशातील 499 शहरांमध्ये व परदेशातील 14 शहरांमध्ये ही परिक्षा घेण्यात आली 13 भाषांमध्ये परीक्षा घेण्यात आली. यात आशिष देखील दिव्यांग कॅटेगीरीतुन परीक्षेला बसलेला होता. या परीक्षेसाठी प्रचंड मेहनत घेत होता. त्याच जोरावर हे दैदिप्यमान यश मिळवले. प्रथम आलेला आशिष भराडीया लहान असताना ऐकण्यास येत नव्हते, त्यामुळे त्याच्या कानावर शस्त्रक्रीया करण्यात आली होती. त्यानंतर त्याने आपल्या अभ्यासात सातत्य ठेवत, दिव्यांगावर मात करत देशात पहिला येण्याचा मान मिळवला आहे.
दरम्यान आशिषचे प्राथमिक शालेय शिक्षण नाशिकच्या फ्रावशी इंटरनॅशनल स्कुलमध्ये झाले आहे. बारावीच्या परीक्षेत त्याला 85 टक्के गुण मिळाले आहेत. तर नीट परीक्षेत त्याला 720 पैकी 690 गुण मिळाले आहेत. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. विशेष म्हणजे आशिषचा भाऊ विश्वेश भराडीया यानेही यापूर्वी अशाच प्रवेश परीक्षेत लक्षणीय यश मिळवत देशात 51 वा क्रमांक पटकावला होता. सध्या ते दिल्लीतील एम्सममध्ये कार्यरत आहेत.

 


कौतुकास्पद! नीट परीक्षेत नाशिकचा आशिष भराडीया दिव्यांगांमध्ये प्रथम