बातम्या

भाजपमध्ये प्रवेश करताच अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले ...

Ashok Chavans first reaction on joining the BJP said


By nisha patil - 2/13/2024 7:39:21 PM
Share This News:




मुंबई : राज्याचे काँग्रेस पक्ष नेते  अशोक चव्हाण यांनी आज उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस व , भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे  यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये करताच अशोक चव्हाण यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.  ते म्हणाले नवीन सुरुवात करत आहे. भाजपची जी काही ध्येयधोरणं आहेत, त्यानुसार काम करेल. पक्ष जो आदेश देईल, फडणवीस जे सांगतील ते काम करणार आहे. मी काही मागणी केली नाही. मला जे काही सांगितलं जाईल ते करेल. मी काँग्रेसमधील सहकाऱ्यांचेही आभार मानतो. त्यांनी सहकार्य केलं. हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. त्यामुळे मी आलो. मी आज जास्त बोलणार नाही. मी पक्षात नवीन आहे. योग्यवेळी योग्य गोष्टी बोलणार आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.

तसेच चव्हाण पुढे म्हणाले, सर्वात आधी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, जेपी नड्डा , फडणवीस, बावनकुळे, शेलार यांचे आभार मानतो. आम्ही विरोधात असतानाही राजकारणाच्या पलिकडेही आम्ही एकमेकांना साथ दिली आहे. आयुष्याची खरी सुरुवात करत आहे. ३० वर्षाच्या राजकीय प्रवासाचा बदल करत आहे. भाजपमध्ये प्रवेश करत आहे. मोदींच्या नेतृत्वात काम करणार आहे. मोदींची स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन काम करत आहे. वाटचाल करणार आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले 

भाजपमध्ये का प्रवेश ?

देशाच्या प्रगतीत योगदान दिलं पाहिजे यासाठी मी आलो आहे. मी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करताना विकासाचा दृष्टीकोण ठेवून मी काम करत राहिलो आहे. विरोधी पक्षात असतानाही आमच्या मतदारसंघाला न्याय देण्यासाठी फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. मी जिथे राहिलो तिथे प्रामाणिकपणे काम केलं आहे. भाजपमध्येही प्रामाणिकपणे काम करणार आहे. राज्यात भाजपला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील याचा प्रयत्न करणार आहे. माझा अनुभव पणाला लावेल. राजकारण हे सेवेचं माध्यम आहे, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.


भाजपमध्ये प्रवेश करताच अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले ...