बातम्या
आशुतोष शर्मानं रचला विक्रम ..........
By nisha patil - 4/19/2024 4:39:14 PM
Share This News:
आयपीएलमध्ये काल झालेल्या मॅचमध्ये 61 धावांची आक्रमक खेळी करणाऱ्या आशुतोष शर्मानं गुजरात टायटन्स विरुद्धच्या मॅचमधून पदार्पण केलं होतं. आशुतोष शर्मानं आतापर्यंत चार मॅचध्ये फलंदाजी केली आहे. आशुतोषला पंजाबनं आठव्या स्थानावर फलंदाजी करण्याची संधी दिलेली आहे. या स्थानावर फलंदाजी करताना आशुतोष शर्मानं 52 च्या सरासरीनं 156 धावा केल्या आहेत. मुंबई विरुद्ध त्यानं 61 धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर गेल्या 17 वर्षात कोणत्याही भारतीय खेळाडूला न जमलेला विक्रम आशुतोष शर्मानं करुन दाखवला आहे.
आशुतोष शर्मानं आयपीएलमध्ये आठव्या स्थानावर फलंदाजी करताना 100 धावांचा टप्पा पूर्ण केलाआहे.आठव्या स्थानावर फलंदाजी करताना 100 धावांचा टप्पा पूर्ण करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. आयपीएलच्या 17 वर्षांच्या इतिहासात एकाही भारतीय खेळाडूला अशी कामगिरी करता आलेली नाही.
आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणाऱ्या दुसऱ्या खेळाडूचं नाव राशिद खान आहे. राशिद खाननं 2023 च्या आयपीएलमध्ये आठव्या स्थानावर फलंदाजी करताना 100 हून अधिक धावा केल्या होत्या. आशुतोष शर्मानं 4 डावात 205.26 स्ट्राइक रेटनं 156 धावा केल्या आहेत. आशुतोष शर्माला पंजाब किंग्जनं लिलावात 20 लाख रुपयांना टीममध्ये घेतलं होतं.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2023 मध्ये आशुतोष शर्मानं रेल्वेच्या टीमकडून सहभाग घेतला होता. अरुणाचल प्रदेश विरुद्धच्या मॅचमध्ये त्यानं 11 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. आशुतोष शर्मानं 12 बॉलमध्ये 53 धावांची खेळी केली होती. त्यामध्ये आशुतोष शर्मानं 8 षटकार आणि 1 चौकार मारला होता. आशुतोष शर्मानं टी 20 मध्ये 19 मॅचमध्ये 33.82 च्या सरासरीनं 575 धावा केल्या आहेत. त्यामध्ये 5 अर्धशतकांचा समावेश आहे.
शिखर धवन च्या नेतृत्त्वात यंदाचं आयपीएल खेळणाऱ्या पंजाब चांगली कामगिरी करता आलेली नाही. पंजाब किंग्जला आतापर्यंत केवळ दोन मॅचमध्ये विजय मिळवता आला आहे. सध्या शिखर धवन जखमी असून त्याच्या जागी सॅम कर्रननं नेतृत्त्व करत आहे.
आशुतोष शर्मानं रचला विक्रम ..........
|