बातम्या

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची विधानसभा मतदार संघ समितीची बैठक...

Assembly Constituency Committee Meeting of Chief Minister Ladki Bahin Yojana


By nisha patil - 2/8/2024 3:07:42 PM
Share This News:



मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना इचलकरंजी विधानसभा मतदार संघ समितीची बैठक आज इचलकरंजी महानगरपालिका येथे समितीचे अध्यक्ष आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
       

 ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना अंतर्गत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात 51 हजार 585 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. सर्वच लाभार्थ्यांना 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाची भेट खात्यात जमा होणार असल्याची माहिती योजना समितीचे अध्यक्ष आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी दिली. त्याचबरोबर मराठीमध्ये अर्ज भरलेला असला तरी तो निकषानुसार पात्र ठरल्यास त्याला मंजूरी मिळणार असल्याचे तसेच इचलकरंजी शहरातून 31 हजार 268 आणि ग्रामीण भागातून  20 हजार 318 असे 51 हजार 585 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या अर्जांची छाननी करुन त्यांना मंजूरी देण्यात आली आहे असे योजना समितीचे अध्यक्ष आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी सांगितले.
     

  यावेळी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, समितीचे सदस्य विठ्ठल चोपडे, समितीचे सदस्य मोहन मालवणकर, उपायुक्त प्रसाद काटकर, उपायुक्त स्मृती पाटील, अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी तथा सदस्य सचिव निवेदिता महाडीक उपस्थित होते


मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची विधानसभा मतदार संघ समितीची बैठक...