बातम्या
मद्यवाहतूक करणाऱ्या वाहनासह आठ लाखांचा मुद्देमाल जप्त
By nisha patil - 10/19/2024 10:10:44 PM
Share This News:
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कणेरीवाडी गावच्या हद्दीत स्कार्पिओ मधील आठ लाखाचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाकडून जप्त करण्यात आलाय.
यामध्ये विविध ब्रँडचे ७५० मिलीचे ३५ बॉक्स, १८० मिलीचे १० बॉक्स असे मद्य मिळून आलंय.याची मद्यवाहनासह एकूण मुद्देमालाची किंमत ७,लाख 97 हजार ६०० आहे.निव्वळ मद्याची किंमत २,९७,६०० आहे. याप्रकरणी आरोपी महेश सुदेश बोबाटे वय २७ रा. माने गल्ली, दौलतवाडी, तालुका कागल, याला अटक करण्यात आलीय.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर जिल्हा अधीक्षक श्रीमती स्नेहलता नरवणे, उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाचे निरीक्षक सदानंद मस्करे,दुय्यम निरीक्षक गिरीश करचे, दुय्यम निरीक्षक अभयकुमार साबळे यांनी केली.
या कारवाईत कांचन सरगर,विलास पोवार,धीरज पांढरे, विशाल भोई, सचिन लोंढे, प्रसाद माळी, साजिद मुल्ला यांनी केलीय.
मद्यवाहतूक करणाऱ्या वाहनासह आठ लाखांचा मुद्देमाल जप्त
|