बातम्या

नूतनीकरणासाठी निधी मंजूर करून आणू अशी ग्वाही

Assurance that funds will be sanctioned for renovation


By nisha patil - 11/25/2023 4:49:45 PM
Share This News:



ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह व राजश्री शाहू खासबाग कुस्ती मैदान या वास्तूंच्या  नूतनीकरण आणि संवर्धनासाठी शासनाकडून निधी मंजूर करून आणण्याची ग्वाही  राजेश क्षीरसागर यांनी दिली 
महापालिका प्रशासक के मंजू लक्ष्मी व अधिकाऱ्यांसोबत  क्षीरसागर यांनी परिसराची पाहणी करून सूचना दिल्या ,यावेळी देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्ष वैशाली शिरसागर,अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसुळे, शहर अभियंता हर्षदीत घाडगे उपशहर अभियंता नारायण भोसले उपस्थित होते
 
नाट्यगृहाचे खराब झालेले छत, बंद पडलेल्या टॉयलेटसह नाट्यगृहातील साहित्य यांच्या दुरुस्तीच्या सूचनाअधिकाऱ्यांना  दिल्या असून लवकरात कामाची पूर्तता होईल असे प्रशासकीय के मंजू लक्ष्मी यांनी सांगितले ,

यावेळी  रंगकारांनी व्यथा मांडल्या राजश्री शाहू खासबाग मैदान व संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह या प्राचीन वास्तूंची दुरावस्था झाली आहे आखाडा म्हणजे गवताचे कुरण झाले आहे मैदानाच्या तटबंदीला भेगा पडल्या आहेत टॉयलेट बंद असल्याने कलाप्रेमींची तसेच महिलांची कुचंबांना होत आहे असे सांगितले या प्रश्नावर लवकरच तोडगा काढला जाईल अशी ग्वाही राजेश क्षीरसागर यांनी दिली


नूतनीकरणासाठी निधी मंजूर करून आणू अशी ग्वाही