बातम्या

अंतरवाली सराटी येथे महिलांनी हातात चपला घेऊन केला निषेध

At Antarwali Sarati women protested with shoes in hand


By nisha patil - 2/17/2024 8:37:41 PM
Share This News:



अंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळी मराठा रणरागिणी आज  आक्रमक झाल्या. मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाने घोषणाबाजी करत त्यांनी हातात चपला घेत त्यांचा निषेध केला.
 

ओबीसी नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ वारंवार मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करत आहेत. त्यामुळे मराठा समाजात तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी मराठा आंदोलक महिलांनी हातात चपला घेत मंत्री छगन भुजबळ यांच्या टीकेचा विरोध केला.
 

‘राजीनामा द्या, राजीनामा द्या, छगन भुजबळ राजीनामा द्या’, ‘आम्ही महिला महिला एकजुटीने लढू… मंत्रालयात कुत्रे सोडू.अशा घोषणा यावेळी छगन भुजबळ यांच्याविरुद्ध देण्यात आल्या. यावेळी जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता


अंतरवाली सराटी येथे महिलांनी हातात चपला घेऊन केला निषेध