बातम्या

कोणत्या वेळी दूध पिणं जास्त ठरतं फायदेशीर रात्री की सकाळी?

At what time drinking milk is more beneficial night or morning


By nisha patil - 6/29/2023 7:23:31 AM
Share This News:



 सर्वांना माहीत आहे की, दूध हा संपूर्ण आहार आहे. लहानांपासून मोठ्यांनी सर्वांनी नियमीत सेवन करायला हवं. पण अलिकडे केवळ लहान मुलांनाच दूध दिलं जातं. पण असे न करता सर्वच वयातील लोकांनी दूधाचं नियमीत सेवन केल्याने त्यांच्या आरोग्याला वेगवेगळे फायदे होतात.

खासकरुन रात्री दूध सेवन केल्याने याचे अधिक फायदे बघायला मिळतात.

दुधात कॅल्शिअम, सोडियम, प्रोटीन, व्हिटॅमि ए, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन बी १२, अमिनो अॅसिड, फायबर आणि अॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात. आयुर्वेदानुसार प्रत्येक वयातील व्यक्तींनी दूध सेवन करणे फायदेशीर आहे. तेच रात्री दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत. जर तुम्ही दूध पित नसाल तर लगेच सुरु करा.

चांगली झोप - ट्रीप्टोफन नावाचं अमिनो अॅसिड दुधात आढळतं. यामुळे झोपेच्या हार्मोन्सचा स्तर वाढतो. याच कारणाने रात्री दूध प्यायल्यास चांगली झोप लागते. रात्री दूध प्यायल्याने यातील फॅट आणि प्रोटीन्स मेल हार्मोन्स अक्टिव करतात. याने प्रजनन क्षमताही वाढते. यात मेलाटोनिन हे तत्वही आढळतं, हे झोपेचा हार्मोन आहे. चांगल्या झोपेसाठी मेलाटोनिन हार्मोन असणे गरजेचे आहे.

हाडांची मजबूती - तज्ज्ञ सांगतात की, हाडांच्या मजबूतीसाठी दूध फार महत्त्वाचं आहे. दुधात कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतात. जे हाडांना मजबूती देण्याचं काम करतात. जर तुम्ही रात्री दूध प्यायलात तर याचा फायदा अधिक होतो.

पोटाची समस्या होते दूर - जर तुम्ही रात्री गरम दूध सेवन केलं जर तुमची पोटाची समस्या दूर होण्यास मदत होते. दोन्ही प्रकारचे फायबर दुधात असल्याने पोटाची समस्या दूर होते.

मांसपेशींचा विकास - दुधात भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात. याने मांसपेशींचा विकास होण्यास मोठा फायदा होतो. प्रोटीन आणि फायबर हे दोन्ही महत्त्वपूर्ण पोषक तत्वे आहेत. जे आपल्या शरीराला वजन मकी करण्यास मदत करतात.

वजन कमी करण्यासाठी - रात्री दूध प्यायल्याने तुम्हाला कॅलरी बर्न करण्यास फार फायदा होतो. कारण दूध प्यायल्याने तुम्हाला चांगली झोप लागते आणि चांगल्या झोपेने कॅलरी बर्न होतात. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर ते सेवन करताना त्यात साखर, चॉकलेट किंवा कोणताही फ्लेवर टाकू नये.


कोणत्या वेळी दूध पिणं जास्त ठरतं फायदेशीर रात्री की सकाळी?