बातम्या
युवा सेनेच्या वतीने शिवाजी विद्यापीठाच्या बाहेर हल्लाबोल...
By nisha patil - 12/12/2023 11:21:54 PM
Share This News:
छत्रपती शिवाजी विद्यापीठात येथील अधिकारी यांनी मनमानी कारभार चालू ठेवला आहे. याचा नाहक त्रास सर्वसामान्य विद्यार्थ्यांना होऊ लागला आहे. याबाबत वारंवार संबधितांना लेखी , उपोषण, आंदोलने करुनही याकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले. नोकर भरती,परिक्षा घोटाळा, विद्यार्थी यांच्या कडे दुर्लक्ष होत आहे.
नोकर भरतीत भ्रष्टाचार केला जात आहे. विद्यापीठ येथे राजकारण सुरू केले असून पंतप्रधान मोदी यांच्या सेल्फी पाँईट सुरु करून विद्यार्थ्यांना अभ्यासा ऐवजी भलत्याच गोष्टीत अडकवुन ठेवले जात आहे.
वरील सर्व समस्यांचे निरासरन करुन या विद्यापिठाला मोकळा श्वास द्यावा.
अन्यथा येणाऱ्या काही दिवसात युवासेना सर्व अधिकाऱ्यांना तोंडा ला काळे फसल्याशिवाय स्वस्त बसणार नाही... अशा पद्धतीचा इशारा युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला... यानंतर रजिस्टार विहान शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांची भेट घेतली व लवकरच भ्रष्टाआरीका यांना निलंबित करू.. व विद्यापीठातील सुरळीतला लवकरच मार्गी लावू असे आश्वासन दिले...आंदोलनाच्या ठिकाणी फ्लेक्स वर कार्टून सिम्बॉल मध्ये अधिकाऱ्यांची फजिती मांडली होती...यावेळी उपस्थित
युवा सेना जिल्हा युवा अधिकारी मंजीत माने, योगेंद्र माने, प्रदीप हांडे, फिरोज मुलानी, शेखर बारटक्के,सानिका दामूगडे माधुरी जाधव, प्रिया माने, अक्षय घाडगे रघु भावे, चैतन्य देशपांडे, प्रतीक भोसले, अवधेश करंबे, कीर्ती कुमार जाधव, सुनील कानूरकर,योगेश लोहार, मारुती कारंडे, प्रथमेश देशिंगे, अनिकेत सुर्वे, आदर्श खडके, सुजित चौगुले, सचिन नागतिलक आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
युवा सेनेच्या वतीने शिवाजी विद्यापीठाच्या बाहेर हल्लाबोल...
|