बातम्या

शाहूपुरी पोलिसांकडून अट्टल चोरटा जेरबंद

Attal thief jailed by Shahupuri police


By nisha patil - 12/9/2023 7:41:00 PM
Share This News:



   चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण पथकास यश.

कोल्हापूर. असुरले येथील संतोष प्रकाश पाटील हे दिनांक 24 रोजी कराड येथील बाजारात आपली म्हैस विकून कोल्हापूर रेल्वे स्टेशन एसटी स्टँड वरून ते असुरले कडे जाणाऱ्या एसटीमध्ये चढत असताना त्यांच्या खिशातील रोख रक्कम 52 ,500 रुपये अज्ञात चोरट्याने चोरल्याचे लक्षात आलं. याची तक्रार त्यांनी  नजीकच्या शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये केली होती. दरम्यान चोरी करणारा चोरटा हा दिनांक 10 रोजी कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक परिसरात आल्याचे खात्रीलाय बातमी शाहूपुरी गुन्हे अन्वेषण पथकाला समजली.  सीसीटीव्ही फुटेज प्राप्त मधील चोरी करणारे व्यक्ती मी तीच असल्याचे खात्री झाल्याने सदर व्यक्ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता तो इसम पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला . पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्या ताब्यात घेतलं. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता तो उडवाउडवी ची उत्तरे देऊ लागला. दरम्यान त्यास विश्वासात घेऊन विचारले असता कोल्हापूर  रेल्वे स्थानक  एसटी स्टँड मधे केलेल्या चोरीची  कबुली दिली.  रमजान उर्फ मुन्ना यासीन चौक (40)  रा.पलूस,   तालुका पलूस जिल्हा सांगली , असं चोरट्याचं  नाव आहे. धरती घेतली असता  ९८ ६० रुपये मिळून आले. उर्वरित ४२६४० रुपये त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहे. तसेच रंगराव कृष्णा पाटील रा. कोडोली  हे बसमध्ये चढत असताना त्यांच्या खिशातील ५००० रुपये चोरल्याचेही सदर चोरट्याने कबूल केले आहे. सदर इसमआकडून  ५७५००रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

    सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणी उपविभागीय पोलिस अधिकारी  अजित टिके यांच्या सुचनेप्रमाणे अजय कुमार सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली  पीएसआय प्रमोद चव्हाण , सहा.फौजदार संदिप जाधव, अंमलदार मिलिंद बांगर , लखन पाटिल . पुढिल तपास पोलीस नाईक वैभव अतिग्रे करत आहेत.


शाहूपुरी पोलिसांकडून अट्टल चोरटा जेरबंद