बातम्या

दारूच्या पैशासाठी तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न

Attempt to kill youth for liquor money


By nisha patil - 1/1/2024 2:50:32 PM
Share This News:



दारूच्या पैशासाठी तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न 

इचलकरंजी : दारूसाठी पैसे न दिल्याने रेकॉर्ड वरील तीन गुन्हेगारांनी एका तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न केला. डोक्यात यंत्र मागच्या लाकडी दांडक्याने झालेला जबर मारहाणीत वैभव शिवाजी कोरवी हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी रोहित शनी कांबळे आणि यश अशोक बनसोडे या दोघांना अटक केली आहे. तर तिसरा संशयित सतरा वर्षीय अल्पवयीन आहे याबाबतची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाले आहे. 
 

 याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार रिंग रोडवरील निरामय सेवा सदन हॉस्पिटलच्या कट्ट्यावर संशयित आरोपींनी वैभव कोरवी यांच्याकडे दारूसाठी पैसे मागितले. मात्र वैभव यांनी तिघांच्या मागणीला न जुमानता पैसे दिले नाहीत. याचा राग मनात धरून रोहित कांबळे याने यंत्रमागच्या लाकडी दांडक्याने वैभव याच्यावर डोक्यावर जबर मारहाण केली. त्यानंतर माऱ्याने हातावर मारून मारहाण केली. सोबत असलेले यश बनसोडे मुलाने लाथाबुक यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. या हल्लात वैभव गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वैभवच्या  फिर्यादीनुसार गावभाग पोलिसांनी जिवे मानाचा प्रयत्न केला प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रोहित कांबळे यश बनसोडे व अल्पवयीन मुलगा हे तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत


दारूच्या पैशासाठी तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न