राजकीय

बोगस मतदान करण्याचा पालकमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रयत्न : समरजीत सिंह घाटगे

Attempts by Guardian Ministers workers to cast bogus votes


By Administrator - 11/20/2024 4:28:07 PM
Share This News:



बोगस मतदान करण्याचा पालकमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रयत्न : समरजीत सिंह घाटगे 

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हाणून पडला प्रयत्न..

कागल शहरातील बुथ क्रमांक 36 व 37 तसेच पिराचिवाडी तालुका कागल या ठिकाणी बोगस मतदान करण्याचा पालकमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांकडूनही प्रयत्न सुरू होता. महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला. समरजितसिंह घाटगे यांनी तातडीने या ठिकाणी धाव घेतली व प्रशासनाला बोगल मताचा प्रकार खपवून घेणार नाही. असा इशारा दिला. अशा बोगस मतदान करण्याच्या प्रक्रियेचा घाटगे यांनी तीव्र शब्दात निषेधही केला.समरजितसिंह घाटगे यांनी बोगस मतदानाच्या बाबतीत या आधीच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. तसेच कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचेही आवाहन केले होते. पालकमंत्री व त्यांच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना दमदाटीही केल्याचे घाटगे यांनी म्हटले आहे. बोगस मतदान करून असंविधानिक पद्धतीने सत्ता मिळवण्याचा पालकमंत्र्यांचा प्रयत्न सुरू आहे.त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे ते असे प्रयत्न करीत आहेत परंतु कोणत्याही परिस्थितीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही. असे समरजितसिंह घाटगे यांनी म्हटले आहे. तसेच कागल शहरात हा बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आणून हाणून पाडल्याबद्दल सिकंदर या कार्यकर्त्याचे घाटगे यांनी अभिनंदन ही केले आहे.


बोगस मतदान करण्याचा पालकमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रयत्न : समरजीत सिंह घाटगे