बातम्या
बोरपाडळे येथील यात्रेसाठी आमदार विनय कोरे यांची उपस्थिती..
By nisha patil - 4/2/2025 1:54:49 PM
Share This News:
बोरपाडळे येथील यात्रेसाठी आमदार विनय कोरे यांची उपस्थिती..
शिवपार्वती चंद्राताई देवीच्या १२५व्या यात्रेला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद
बोरपाडळे (ता. पन्हाळा) येथे ग्रामदेवी शिवपार्वती चंद्राताई देवीच्या १२५ व्या यात्रेनिमित्त आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी देवीचे दर्शन घेतले. यात्रेनिमित्त आयोजित महाप्रसादाचे वाटपही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
या सोहळ्यात बोरपाडळे गावचे सरपंच शरद जाधव, संचालक शिवाजी बिरजे (सरकार), ग्रामपंचायत सदस्य सौरभ निकम (सरकार), सुजित देवकर, सिताराम कुंभार (बापू), भारत पाटील, रघुनाथ कोळी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बोरपाडळे येथील यात्रेसाठी आमदार विनय कोरे यांची उपस्थिती..
|