बातम्या

विवेकानंदच्या ग्रंथालयात पुस्तके ऑटोमेटेड जमा करणारे क्यूआस मशीन कार्यरत

Automated book depositing QAS machine in Vivekanandas library


By nisha patil - 2/10/2024 4:45:53 PM
Share This News:



 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या येथील विवेकानंद  कॉलेजमधील ग्रंथालयात आज पुस्तके ऑनलाइन जमा करणाऱ्या ऑटोमॅटिक  क्यूआस मशीनचे उद्घाटन संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ.अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते झाले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, आय क्यू ए सी समन्वयक डॉ. श्रुती जोशी, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.   विवेकानंद कॉलेज ग्रंथालयाने ग्रंथालय ऑटोमेशन साठी या मशीनच्या माध्यमातून पुढचे पाऊल टाकलेले आहे. या  मशीनमध्ये विद्यार्थ्यांनी नावावर घेतलेली पुस्तके बारकोड स्कॅनर द्वारे आपोआप जमा केली जातात. यामध्ये विद्यार्थ्यांचा  वाचकांचा, सेवकांचा वेळ वाचतो. पश्चिम महाराष्ट्रातील ग्रंथालयांमध्ये हे प्रथमच मशीन आलेले आहे. एटीएम मध्ये आपण पैसे जमा करतो तशाच पद्धतीने पुस्तके या मशीनमध्ये जमा केली जातात. विवेकानंद कॉलेजमध्ये 9000 हून अधिक विद्यार्थी, 350 पेक्षा अधिक स्टाफ व संस्थेचे इतर स्टेक होल्डर्स वाचक सभासद आहेत. या ग्रंथालयात पुस्तक देवघेवीचा मोठा ताण असतो. या ग्रंथालयाने यापूर्वीच कॉम्प्युटऱ्याझेशन अटोमेशनमध्ये आघाडी घेतलेली आहे. ऑनलाइन पुस्तक देवघेव संगणक प्रणालीच्या द्वारे केली जाते. या मशीनद्वारे पुस्तके आपोआप जमा केली जातात. 

कार्यक्रमाचे स्वागत ग्रंथपालaडॉ. निता पाटील यांनी केले. प्रास्ताविक व संयोजन सहाय्यक ग्रंथपाल हितेंद्र साळुंखे यांनी केले.  या उपक्रमासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष श्री अभयकुमार साळुंखे, सचिवा प्राचार्य सौ. शुभांगी गावडे, सीईओ श्री कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळाले. कार्यक्रमाचे संयोजनासाठी रजिस्ट्रार श्री.आर.बी.जोग, ग्रंथालयातील डॉ. जगताप ,सौ जाधव ,श्री नारे, श्री इंगळे   यांचे सहकार्य लाभले.


विवेकानंदच्या ग्रंथालयात पुस्तके ऑटोमेटेड जमा करणारे क्यूआस मशीन कार्यरत