बातम्या

राधानगरी धरणाचे ६ नंबरचा स्वयंचलित दरवाजा उघडला

Automatic Gate No 6 of Radhanagari Dam opened


By nisha patil - 7/26/2023 9:51:25 AM
Share This News:



राधानगरी धरणाचे ६ नंबरचा स्वयंचलित दरवाजा उघडला

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील लक्ष्मी तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे धरणाच्या  स्वयंचलित सात दरवाज्या पैकी सहा क्रमांकाचा दरवाजा आज सकाळी आठ वाजता खुला झाला. हे धरण ३४७.५० फुटपातळीला पूर्ण क्षमतेने भरते,  मात्र वाऱ्याचा प्रचंड दाब असल्याने ३४७.२० फूट पातळीला हा दरवाजा खुला झाला आहे. यातून चौदाशे पन्नास क्युसेक आणि वीज निर्मितीसाठी चौदाशे असा २८५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सध्या सुरू झाला आहे. पावसाचा जोर कायम असून पाणी पातळी वाढल्यास आणखी दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे. 
प्रशासना मार्फत नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे


राधानगरी धरणाचे ६ नंबरचा स्वयंचलित दरवाजा उघडला