बातम्या

शिक्षकी पेशा सांभाळत कला व सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा अवलिया...

Avlia who is a leader in art and social work while maintaining the teaching profession


By nisha patil - 3/18/2024 11:27:43 PM
Share This News:



शिक्षकी पेशा सांभाळत कला व सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा अवलिया...

इचलकरंजी: मोहम्मद रफी इब्राहिम मांगुरे ताराबाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज शहापूर येथे सहाय्यक शिक्षक म्हणून काम करतात शिक्षणाबरोबरच सामाजिक कार्यात अग्रेसर असून एक विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. येत्या काही दिवसात रप्पाटा चित्रपट प्रदर्शित होत असून त्यामध्ये फडतारे सरांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये ते प्रथमच रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत या चित्रपटाच्या माध्यमातून ते प्रथमच रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहेत. डमरू फिल्म प्रोडक्शन निर्मित दिग्दर्शक प्रेम सागर सूर्यवंशी,  निर्माता सुहास सूर्यवंशी,  सहनिर्माते विजय जाधव,  संदीप जाधव व जितेंद्र देवकर अशी संपूर्ण टीम असून प्रत्येकाने या चित्रपटांमध्ये आपले योगदान दिले असून मोहम्मद रफीक इब्राहिम मांगुरे यांनी  महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. येत्या 19 मार्चला ते वयाचे 55 वर्ष पूर्ण करत असून त्यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा व चित्रपटाच्या माध्यमातून ज्या रप्पाटा या बहुचर्चित चित्रपटातून ते प्रथमच पडद्यावर झळकणार आहेत. त्या चित्रपटासाठी त्यांना तारा न्यूज च्या संपूर्ण टीम कडून हार्दिक शुभेच्छा...


शिक्षकी पेशा सांभाळत कला व सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा अवलिया...