बातम्या

हे पदार्थ अंड्यासोबत खाणं टाळा! कोणते आहेत असे पदार्थ? वाचा

Avoid eating these foods with eggs


By nisha patil - 9/30/2023 8:18:56 AM
Share This News:



आपल्याकडे खाण्या-पिण्याची काही पथ्ये आहेत. ही पथ्ये आपण पाळली तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. अंडी आरोग्यासाठी चांगली असतात आपल्याला अंडी उकडून खाण्याचा, ऑमलेट खाण्याचा सल्ला दिला जातो.

असे काही पदार्थ आहेत जे अंड्यासह अजिबात खाऊ नयेत, कोणते पदार्थ आहेत बघुयात...केळी आणि अंडी कधीही एकत्र खाऊ नयेत. केळीमध्ये फायबर असतं, पोटॅशियम असतं. केळीसुद्धा पौष्टिक असते आणि अंडी सुद्धा. पण हे दोन्ही एकत्र खाणे खूप वाईट आहे. जर तुम्हाला हे खायचंच असेल या दोन्हीमध्ये दोन तासांचं अंतर असावं.अंड्यासोबत मिठाई खाल्ली तर पोट बिघडू शकतं. खूपच खायची इच्छा असेल तर तासाभराचं अंतर ठेवा. अंतर ठेवलं तर तुमचं शरीर हे अन्न पचवू शकते. त्यामुळे खूप गोड, साखरयुक्त पदार्थ खायचे असतील तर ते अंड्यासह खाऊ नयेत.चहा आणि कॉफी मध्ये कॅफिन असते. कॅफिन आणि प्रथिने, अंडे आणि चहा किंवा कॉफी एकत्र खाल्लं की पोटदुखी होते, अपचन होते त्यामुळे हे पदार्थ कधीच एकत्र खाऊ नये.अंड्यासह सोया खाऊ नये. आपल्या शरीराला प्रथिनांची गरज प्रमाणात असते. मर्यादेपेक्षा जर प्रथिनांचं सेवन केलं तर त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. या कारणामुळेच अंड्यासह सोयाबिनचे सेवन करू नये. दोन्हीमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. एकतर अंडं खावं नाहीतर सोयाबीन.


हे पदार्थ अंड्यासोबत खाणं टाळा! कोणते आहेत असे पदार्थ? वाचा