बातम्या

हिवाळ्यात श्वसनाच्या आजारांना दूर पळवा

Avoid respiratory diseases in winter


By nisha patil - 11/23/2023 7:19:35 AM
Share This News:



गुलबी थंडी सर्वांनाच हवीहवीशी वाटते. पहाटेच्या धुक्यात फिरायला सर्वानाच मजा येते पण या गुलबी थंडी सोबतच काही आजार देखील येतात. थंडीच्या दिवसांत श्वसनाचे विकार अधिक बळावतात. ज्या व्यक्तींना फुफ्फुसाचे आजार असतात त्यांना हे त्रास अधिक जाणवतात. थंडीच्या दिवसातील कोरडी हवा फुफ्फुसासंर्भातील आजारांना कारणीभूत ठरते. हे आजार बळावू नये यासाठी खास टीप्स  हिवाळ्याच्या दिवसात शरीर गरम राहिल असे कपडे घाला

— योग्य आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या

–डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं वेळेवर घ्या–जर तुम्हाला श्वसनासंदर्भात किंवा अस्थमाचा त्रास असेल तर कुठेही जाताना सोबत तुमची औषधं बरोबर ठेवावी. आणि जर त्रास जाणवू लाaगला तर तातडीने औषधं घ्यावीत

–घरी असताना देखील शरीर गरम कसं राहिल हे पहा. एकाच जागी बसन राहू नका. शारीरिक हालचाल करा

–वेळेवर जेवा. जेणेकरून शरीराला उर्जा मिळण्यास मदत होईल


हिवाळ्यात श्वसनाच्या आजारांना दूर पळवा