बातम्या

मधुमेह नको असेल तर 'या' सवयी टाळा!

Avoid these habits if you dont want diabetes


By nisha patil - 7/29/2023 7:33:54 AM
Share This News:



मधुमेह हा आजार जगभरातील अनेक लोकांना आपला बळी बनवत आहे. मधुमेह एकदा एखाद्याला झाला की तो आयुष्यभर राहतो. लोक याला इतके घाबरतात की, कोणत्याही शत्रूला हा आजार होऊ नये, अशी प्रार्थना करतात.

यामुळे मूत्रपिंडाचा आजार आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका ही वाढतो. जर तुम्हाला मधुमेह नको असेल तर तुम्हाला दैनंदिन जीवनातील काही सवयी बदलाव्या लागतील.

मधुमेह अनुवांशिक कारणांमुळे होऊ शकतो, परंतु हे सहसा विचित्र जीवनशैली आणि खराब खाण्याच्या सवयीमुळे होते. त्यामुळे आपल्या सवयींमध्ये काही सुधारणा करणे चांगले, जेणेकरून आपल्याला हा आजार होणार नाही.

निरोगी प्रौढ व्यक्तीने दिवसभरात किमान 7 ते 8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे, तसे न केल्यास आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात, मधुमेह हे देखील त्यापैकीच एक आहे. कमी झोप घेतल्यास भूक नियंत्रित करणाऱ्या आणि रक्तातील ग्लुकोज टिकवून ठेवणाऱ्या हार्मोन्सचा प्रभाव कमी होतो, ज्यामुळे प्रथम लठ्ठपणा वाढेल आणि मधुमेहाचा धोका वाढेल.

आजकाल अनेक जण शाळा, कॉलेज किंवा ऑफिसला जाण्याच्या घाईत नाश्ता टाळतात, पण यामुळे आपल्या आरोग्याचे खूप नुकसान होते, अशी चूक करायला विसरू नका, अन्यथा तुम्ही लवकरच मधुमेहाचे शिकार होऊ शकता. नाश्ता न केल्यामुळे दुपारच्या जेवणापर्यंत भूक लागते, ज्यामुळे रक्तातील साखर आणि इन्सुलिनची पातळी राखली जात नाही.

रात्रीच्या जेवणानंतर काहीही खाण्याची सवय! सर्वप्रथम आपण रात्रीच्या जेवणात हेल्दी डाएट घ्यावा आणि त्यानंतर जर आपल्याला रात्री काही खाण्याची सवय असेल तर आजच सोडा. जर तुम्हाला रात्री उशीरा भूक लागली असेल तर अनहेल्दी चिप्स किंवा स्नॅक्स खाण्याऐवजी ड्रायफ्रूट्स खा. गोड गोष्टी पूर्णपणे टाळा.


मधुमेह नको असेल तर 'या' सवयी टाळा!