बातम्या

थंडीच्या दिवसांमध्ये कोणतं पाणी प्यावं, ही चूक टाळाच

Avoid this mistake of which water to drink in cold days


By nisha patil - 2/1/2024 7:25:14 AM
Share This News:



सकाळी उठल्यानंतर चालण्याचा सल्ला देतात. दररोज सकाळी चालल्यामुळे आपलं अनेक गंभीर आजारांपासून संरक्षण होतं. चालल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते, शुगर नियंत्रणात राहते, शरीरातील चरबी कमी होते. त्यामुळे चालणं हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतं. पण चालल्यानंतर गरम पाणी प्यावं की थंड पाणी प्यावं असा प्रश्न बहुतेक लोकांना पडतो. आपण सकाळी चालून आल्यानंतर आपल्या शरीरातील बीपी वाढतो. त्यामुळे प्रत्येकाने चालल्यानंतर थंड पाणी पिणं फायदेशीर ठरतं. पण थंडीच्या दिवसांमध्ये चालल्यानंतर थंड पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरातील तापमानात अचानक बदल होतो. त्यामुळे आपल्याला ताप, सर्दी, खोकला अशा अनेक आजारांचा सामना करावा लागतो. तसंच थंड पाणी पिल्यामुळे आपल्या हृदयाच्या कार्यावरही दबाव येऊ शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत कोमट पाणी पिणे गरजेचे आहे. हिवाळ्यात कोमट पाणी पिल्यामुळे आपलं अनेक आजारांपासून संरक्षण होतं आणि ते शरीरासाठी फायदेशीर ठरतं.

सकाळी चालल्यानंतर कोमट पाणी पिल्यामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. कोमट पाणी हे आपल्या हृदयासाठी फायदेशीर आहे. हे पाणी हृदयाचे कार्य सुधारण्यास मदत करते. तर कोमट पाणी हे आपल्या रक्तात मिसळते त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. तसंच आपला रक्तदाब संतुलित करण्यास मदत करते.

कोमट पाणी हे आपल्या पोटासाठी देखील फायदेशीर आहे. सकाळी चालल्यानंतर प्रत्येकानं दररोज कोमट पाणी पिणं गरजेचं आहे. कोमट पाणी पिल्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते, पचनाशी संबंधित सर्व समस्या कमी करते. तसंच कोमट पाणी पिल्यामुळे पोटदुखी, उलट्या, जुलाब या समस्यांपासून देखील आपला बचाव होते. तर हे पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरातील चरबी देखील कमी करण्यास मदत होते.


थंडीच्या दिवसांमध्ये कोणतं पाणी प्यावं, ही चूक टाळाच