बातम्या
शाहूवाडी एमआयडीसीला आवळी ग्रामस्थांचा विरोध : ग्रामसभेत कडाडून विरोध करत आवळी गाव प्रस्ताविक आराखड्यातून वागळण्यात यावे असा ठराव.
By nisha patil - 11/2/2024 9:42:49 PM
Share This News:
पैजारवाडी : प्रतीनिधी आवळी (ता पन्हाळा) येथील ग्रामस्थांनी शाहूवाडी तालुक्यातील डोणोली -आवळी, सातळीदेवी पठार येथे प्रस्तावित एमआयडीसीला ग्रामसभेत कडाडून विरोध केला आहे. शिवाय आवळी हे गाव प्रस्ताविक आराखड्यातून वागळण्यात यावे असा एकमताने ठराव ही करण्यात आला आहे.
शाहुवाडी तालुक्यातील डोणोली - आवळी, सातळीदेवी पठार येथील प्रस्तावित एमआयडीसी च्या जागेसाठी ड्रोनच्या सहाय्याने सर्वेक्षण पूर्ण झाले असून या बाबतचे नकाशे व आराखडा सर्वेक्षण कंपनीकडून सादर झाले आहेत. त्यानुसार गट क्रमांक निश्चित होवून जमीन मालकांना मोबदल्यासह अधिसूचना प्रसिद्ध होणार असल्याची वृत्त समजताच आवळी ग्रामस्थाच्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
या सर्वेक्षण बाबत कोणास माहिती किंवा कल्पना नाही परिसरातील जमीन मालकांना कुठे ही विश्वासत न घेता आराखडा व सर्वेक्षण करण्यात आल्याने संताप व्यक्ती करत आवळी ग्रामस्थांनी ग्रामसभेत कडाडून विरोध दर्शवीला आहे.
शिवाय सद्या सुरु असलेल्या नागपूर-रत्नागिरी या महामार्गासाठी आवळी ग्रामस्थांची शेकडो एकर जमीन संपादित झाली आहे. आणखीन या प्रकल्पासाठी जमीन संपादित झाल्यास विकासाच्या नावाखाली भांडवालदारसाठी अनेक अल्पभूधारक शेतकरी भूमीहीन होणार आहेत. या औद्योगिकीकरणामुळे परिसरात होणारे प्रदूषण तसेच वातावरणासह निसर्गाची मोठी हानी लक्षात घेता आवळी हे गाव प्रस्ताविक आराखड्यातू वागळण्यात यावे असा एकमताने ठराव करण्यात आला आहे.
यावेळी आवळी गावातील शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाहूवाडी एमआयडीसीला आवळी ग्रामस्थांचा विरोध : ग्रामसभेत कडाडून विरोध करत आवळी गाव प्रस्ताविक आराखड्यातून वागळण्यात यावे असा ठराव.
|