बातम्या

अविनाश सूर्यवंशी आदर्श रंगकर्मी पुरस्काराने सन्मानित

Awarded Avinash Suryavanshi Adarsh ​​Rangkarmi Award


By nisha patil - 6/12/2023 4:26:20 PM
Share This News:



अविनाश सूर्यवंशी आदर्श रंगकर्मी पुरस्काराने सन्मानित 

इचलकरंजी : प्रतिनिधी येथील गंध फुलांचा मराठी गीतांचा कार्यक्रमाचे निर्माते, शिरोळ मंडल अधिकारी अविनाश सूर्यवंशी यांना नुकताच शिरोळ येथे कलाविश्व रंगभूमी व सोशल फौंडेशनच्या वतीने आदर्श रंगकर्मी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.नुकताच हा पुरस्कार वितरण सोहळा शिरोळ येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

इचलकरंजीचे सुपूत्र असलेले अविनाश सुर्यवंशी हे शासकीय नोकरीत असतानाही कार्यालयीन वेळेशिवाय हौशी कलाकार म्हणून सर्व परिचित आहेत.याशिवाय ते विविध माध्यमातून सर्वांना मदतीचा हात देऊन खरीखुरी माणुसकी जोपासतात.विशेष म्हणजे  ते 'गंध फुलांचा' या मराठी गीतांच्या कार्यक्रमाचे निर्माते आहेत. भाव गीत, भक्ती गीतांची स्वर मैफिल रंगवणारा 'गणरंग' व 'गंध फुलांचा' या कार्यक्रमास प्रेक्षकातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.कला- सांस्कृतिक क्षेत्रातील या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊनच त्यांची शिरोळ येथे कलाविश्व रंगभूमी व सोशल फौंडेशनच्या वतीने आदर्श रंगकर्मी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.या पुरस्काराचे वितरण शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्या हस्ते तसेच दत्त साखर कारखान्याचे संचालक शेखर पाटील , गटविकास अधिकारी शंकर कवितके ,माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील ,दत्त साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एम.व्ही.पाटील सामाजिक कार्यकर्त्या डॉ.आशाताई गाडीवडर  - शिंदे ,सिने अभिनेत्री रेश्मा शेख यांच्या प्रमुख  उपस्थितीत करण्यात आले. यावेळी कलाविश्व रंगभूमी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान , कार्याध्यक्ष डॉ.दगडू माने , सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील - कणंगलेकर ,उदय शिरोळकर , जेष्ठ पञकार सुनील इनामदार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.या पुरस्काराबद्दल अविनाश सूर्यवंशी यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.


अविनाश सूर्यवंशी आदर्श रंगकर्मी पुरस्काराने सन्मानित