बातम्या

शिवाजी विद्यापीठाकडून डीकेटीईस अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा प्राप्त

Awarded the status of DKTES authorized autonomous college by Shivaji University


By nisha patil - 4/7/2023 12:22:51 PM
Share This News:



इचलकरजी : प्रतिनिधी   शिवाजी विद्यापीठाकडून डीकेटीईच्या टेक्स्टाईल अँण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूटला शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा प्राप्त झाला आहे. या दर्जामुळे विद्यापीठ व महाविद्यालयाचे एकत्रित पदवी प्रदान करणे शक्य होणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार मिळालेली ही शैक्षणिक स्वायत्तता विद्यार्थी हिताची ठरणार आहे.


शिवाजी विद्यापीठाकडून परिपत्रक काढून स्वायत्त महाविद्यालयाकडून अधिकारप्रदत्त दर्जासाठी अर्ज मागविले होते. विद्यापीठास प्राप्त झालेल्या अर्जाची रितसर छाणणी करुन डीकेटीई स्वायत्त महाविद्यालयाचा अर्ज यात पात्र ठरला. पात्र अर्ज विद्यापरिषदेच्या शिफारीषीेन व्यवस्थापन परिषदेने मान्य केला.
विद्यापीठ अनुदान आयोग आणि राज्य शासनाच्या अधिसुचनेनुसार उत्कृष्टताक्षम आणि उच्चस्तरीय दर्जा प्राप्त केलेल्या विद्यापीठांशी संलग्नित डीकेटीई महाविद्यालयाला त्यांच्या स्वायत्तेच्या कालावधी इतका अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा देण्यात आला आहे. यामुळे महाविद्यालयाचे एकत्रित पदवी प्रदान करण्याबरोबरच, नविन प्रमाणपत्र, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करणे अधिक सुलभ होणार आहे. विषेश म्हणजे, विद्यापीठाच्या मंजुरीने डीकेटीईस पीएचडीचे अभ्यासक्रम देखील सुरु करता येतील आणि या अभ्यासक्रमासाठी शुल्क रचना निर्धारित करणे, अशा अनुषांगिक बाबी साठीचे स्वातंत्र्य देखील मिळणार आहे. इंडस्ट्रीच्या गरजेनुसार अभ्यासक्रमात बदल करणे, त्याची पुर्नरचना करणे, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नामाभिधानाप्रमाणे अभ्यासक्रमांची नांवे बदलणे, मुल्यांकनाची पध्दत निश्‍चीत करणे, निकाल जाहीर करणे, गुणपत्रके बहाल करणे याची मुभा देखील डीकेटीईस मिळणार आहे.
याअधिही डीकेटीईस एआयसीटीई दिल्ली यांनी तीनदा ‘बेस्ट इंडस्ट्री - लिंकड् टेक्नीकल इन्स्टिटयूट‘ या देशपातळीवरील सर्वोच्च पुरस्काराने डीकेटीईस सन्मानित केलेले आहे. तसेच नॅक मार्फत सलग दोन वेळेस डीकेटीईस ए प्लस चा सन्मान प्राप्त झाला आहे व नुकतेच जाहीर झालेल्या एनबीए मानांकनात देखील डीकेटीई अग्रेसर राहीली आहे. एनआयआरएफ इनोवेशन रँकिंगमध्ये देखील डीकेटीईचा समावेश करण्यात आला आहे.
यासाठी संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, खजीनदार प्रकाश दत्तवाडे, मानद सचिव डॉ.सौ. सपना आवाडे व सर्व विश्‍वस्त यांचे मार्गदर्शन मिळाले. इन्स्टिटयूटच्या प्र.संचालिका प्रा.डॉ सौ. एल.एस.आडमुठे, डे.डायरेक्टर प्रा. डॉ. यु. जे. पाटील, सर्व डीन्स, सर्व विभागप्रमुख,प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी,माजी विद्यार्थी यांचा या यशात मोलाचा वाटा आहे.


शिवाजी विद्यापीठाकडून डीकेटीईस अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा प्राप्त