बातम्या

पंकज त्रिपाठींच्या 'कडक सिंह' चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर नुकताच रिलीज

Awesome trailer of Pankaj Tripathi s movie Kadak Singh released recently


By nisha patil - 11/28/2023 5:56:42 PM
Share This News:



आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये विशेष स्थान निर्माण करणारे अभिनेते पंकज त्रिपाठी हे सध्या त्यांच्या 'कडक सिंह'  या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं. आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमधील पंकज त्रिपाठी यांच्या अभिनायनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 

'कडक सिंह' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पंकज त्रिपाठी हे एके श्रीवास्तव ही भूमिका साकारताना दिसत आहेत, एके श्रीवास्तवचा स्मृतिभ्रंश झाला आहे. त्यामुळे त्याला बऱ्याच गोष्टी आठवत नाहीयेत, असं ट्रेलरमध्ये दिसत आहे. 'कडक सिंह' या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर हा अंदाज लावला जाऊ शकतो की हा चित्रपट क्राईम थ्रिलर असणार आहे.  'कडक सिंह' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर या ट्रेलरमधील पंकज त्रिपाठी यांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं आहे
'कडक सिंह' हा चित्रपट  8 डिसेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे. पंकज त्रिपाठी यांचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

पंकज त्रिपाठी यांनी कडक सिंह चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या ट्रेलरला त्यांनी कॅप्शन दिलं, "एक अपघात, चार कथा,एक अस्पष्ट सत्य कडक सिंह सत्य शोधू शकतील का? ट्रेलर आऊट!"


पंकज त्रिपाठींच्या 'कडक सिंह' चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर नुकताच रिलीज