बातम्या
रेशन दुकानात मिळणार आता 'आयुष्यमान कार्ड '
By nisha patil - 2/11/2023 6:33:42 PM
Share This News:
केंद्र शासनाकडून आयुष्यमान भारत पंतप्रधान मंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत तर राज्य शासनाकडून महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत पाच लाखापर्यंत औषध उपचार मोफत दिले जाणार आहेत याकरिता लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्ड म्हणजेच आभा कार्ड दिले जाणार आहे राज्यात सुमारे दोन कोटी तर जिल्ह्यात सुमारे साडेपाच लाख लोकांना हे कार्ड देण्याचे नियोजन आहे.
देशातील अन्य राजांच्या तुलनेत महाराष्ट्रात आभाकार्ड काढण्याचे प्रमाण कमी आहे यामुळे या कार्डची निर्मिती व वितरणाची गती वाढवण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधि कारणाकडून बी आय एस 2.0 ही सुधारित संगणक प्रणाली राज्यात लागू केली जाणार आहे ही प्रणाली लागू झाल्यानंतर लाभार्थ्यांना मोबाईलच्या सहाय्याने आयुष्यमान कार्ड निर्माण करणे सोयीचे होईल.
यासाठी आता रेशन धान्य दुकानदारांची मदत घेतली जाणार आहे याकरिता त्यांनाही प्रशिक्षण देणे देऊन त्यांचे लॉगिन आयडी तयार करण्यात येणार आहे.
आभा कार्ड काढण्यासाठी नागरिकांना सोयीचे ठिकाण उपलब्ध होणार आहे कार्ड काढल्यानंतर ते संबंधितांच्या घरपोच केले जाणार आहे धान्य दुकानदारांकडेही पोस्ट मशीनवर सर्व ई- पॉस मशीनवर सर्व ई - केवाईसीचा डाटा उपलब्ध असल्याने कार्ड काढण्याची प्रक्रिया जलद गतीने होणार आणि लवकरच लोकांना याच्या सुविधा मिळणार आहेत.
रेशन दुकानात मिळणार आता 'आयुष्यमान कार्ड '
|