बातम्या

BCCI उपकर्णधारपदाची जबाबदारी 'या' खेळाडूकडे देणार...

BCCI will give the responsibility of vicecaptaincy to this player


By nisha patil - 7/1/2025 7:53:30 PM
Share This News:



 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे तर भारताचे सामने दुबईत होणार आहेत. भारतीय क्रिकेटमध्ये अलीकडच्या काळात बरेच काही घडलंय. तर रोहित शर्माची कर्णधारपदी निवड असल्याचं सांगण्यात आलंय तर जसप्रीत बुमराहला चॅम्पियन्स टीम इंडियाचा उपकर्णधार बनवले जाऊ शकते.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. तर भारताचे सामने दुबईत होणार आहेत. भारतीय क्रिकेटमध्ये अलीकडच्या काळात बरेच काही बदल घडलेत. जसप्रीत बुमराहला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार बनवले जाऊ शकते. रोहित शर्माची कर्णधारपदी निवड निश्चित असल्याचंही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. जर बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त असेल तर त्याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी मिळणार हे निश्चित आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसोबतच इंग्लंडविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठीही संघाची घोषणा केली जाणार असुन भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिका 6 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.


BCCI उपकर्णधारपदाची जबाबदारी 'या' खेळाडूकडे देणार...
Total Views: 64