बातम्या

भाजपचं अखेर ठरलंच ..! साताऱ्यातुन उदयनराजे यांना मिळाली उमेदवारी

BJP has finally decided


By nisha patil - 4/16/2024 4:42:25 PM
Share This News:



सातारा येथून भाजप कुणाला उमेदवारी देणार याची प्रतीक्षा संपली आहे. या जागेचा भाजपचा तिढा सुटला आहे. भाजपने जारी केलेल्या नव्या यादीत सताऱ्यातून खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता सताऱ्यातून उदयनराजे लोकसभा निवडणूक लढणार हे स्पष्ट झाले आहे. भोसले यांची उमेदवारी जाहिर होताच त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. भाजपच्या केंद्रीय कमिटीकडून नवी यादी जारी करण्यात आली असून यात उदयनराजेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.


सातारा येथून भाजप कुणाला उमेदवारी देणार या बाबत उत्सुकता लागून होती. उदयनराजे यांना यंदा तिकीट मिळणार नाही अशा चर्चा होत्या. मात्र, आपल्यालाच उमेदवारी मिळावी या साठी छत्रपती उदयनराजे भोसले हे आग्रही होते. मात्र, त्यांची उमेदवारी जाहीर होत नसल्याने ते नाराज होते. या साठी ते दिल्लीला देखील जाऊन आले. त्यानंतर उधाणसिंह राजे यांनी गृहमंत्री अमित शाह यांचगी भेट घेतली त्यांनतर , काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे यांनाच उमेदवारी मिळणार अशी घोषणा केली होती.
 

खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव जाहीर झाले नव्हते. असे असेले तरी सुध्दा त्यांनी प्रचार संभाचा धडाका सुरू केला होता. त्यांनाच उमेदवारी मिळणार या बाबत त्यांचा विश्वास ठाम होता. अखेर त्यांचा हा विश्वास खरा ठरला आहे. भाजपने उदयनराजे भोसले यांच्या नावाची घोषणा केल्याने आता येथील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे विरुद्ध भाजपचे उदयनराजे भोसले अशी साताऱ्यात थेट लढत होणार आहे. आज त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.


भाजपचं अखेर ठरलंच ..! साताऱ्यातुन उदयनराजे यांना मिळाली उमेदवारी