बातम्या

भाजपने खासदारांबाबत घेतला मोठा निर्णय ...!

BJP has taken a big decision regarding MPs


By nisha patil - 1/3/2024 10:59:46 PM
Share This News:



मुंबई । केंद्रात सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारांची नाव निश्चित करण्यासाठी भाजपाला बरच मंथन कराव लागतय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या खासदारांच प्रदर्शन चांगलं नाहीय, त्यांच तिकीट कापण्यासाठी मागे-पुढे पाहणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आधीच म्हणाले आहेत की, प्रत्येक जागेवर कमळ निवडणूक लढतोय. भाजपाकडून 60 ते 70 विद्यमान खासदारांच तिकीट कापल जाऊ शकतं.

तीनवेळा लोकसभा निवडणूक जिंकणाऱ्या तसच वय झालेल्या काही खासदारांच्या जागी नवीन चेहरे दिले जातील. जास्त ओबीसी खासदारांचे तिकीट कापले जाणार नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे 303 खासदार निवडून आले होते. यात 85 ओबीसी खासदार आहेत. नमो App वर जनतेकडून खासदारांबद्दल फिडबॅक घेण्यात आला. आपपाल्या भागातील तीन सर्वाधिक लोकप्रिय भाजपा नेत्यांची नाव विचारण्यात आली.

मागच्या दोन वर्षांपासून भाजपा खासदारांकडून सतत त्यांच्या कामाचा रिपोर्ट मागितला जातोय. सर्वे करणाऱ्या एजन्सीकडून प्रत्येक लोकसभा क्षेत्राचा रिपोर्ट मागितला आहे. भाजपाशासित राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मंत्र्याची ड्युटी लावण्यात आली आहे. या मंत्र्यांना लोकसभा मतदारसंघाचा दौरा करुन खासदारांच रिपोर्ट कार्ड मागवण्यात आलं आहे. मंत्री आणि संघटनेकडून मिळालेला रिपोर्ट प्रदेश स्तरावर निवडणूक समितीच्या बैठकीत मांडण्यात आला. संघटन सरचिटणीस आणि आरएसएसचा फिडबॅक ठेवण्यात आला.


भाजपने खासदारांबाबत घेतला मोठा निर्णय ...!