बातम्या

भाजप नेत्या सना खान हत्या प्रकरणाला नवं वळण

BJP leader Sana Khan murder case takes a new turn


By nisha patil - 2/16/2024 6:12:02 PM
Share This News:



 देशभर गाजलेल्या नागपूरातील भाजप  आघाडीच्या नेत्या सना खान  यांच्या हत्या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. या हत्या प्रकरणात अत्यंत धक्कादायक खुलासे  य पोलीस तपासात  पुढे आले आहेत अमित साहूच्या घरातून सना खान यांच्याशिवाय इतर दोन लोकांच्या रक्ताचे डाग फॉरेन्सिक तपासणीत सापडले आहे. पोलिसांनी त्या रक्ताची डीएनए चाचणी केली असून ते रक्त सना खान आणि अमित साहू यांच्या व्यतिरिक्त आणखी दोन व्यक्तीचे असल्याचे समोर आले आहे.

देशभरात नागपूरातील भाजप अल्पसंख्यांक आघाडीच्या नेत्या सना खान यांच्या हत्या प्रकरणात काही अत्यंत धक्कादायक खुलासे झाले आहे. 2 ऑगस्ट 2023 रोजी सना खान यांची हत्या झाली, त्या दिवशी अमित साहूच्या जबलपूर येथील घरी मारेकरी अमित शाहू आणि सना खान यांच्या व्यतिरिक्तही एक पुरुष आणि एक महिला उपस्थित होते कारण पोलीस तपासात अमित साहूच्या घरातून सना खान यांच्याशिवाय इतर दोन लोकांच्या रक्ताचे डाग फॉरेन्सिक तपासणीत सापडले आहे. पोलिसांनी त्या रक्ताची डीएनए चाचणी केली असून ते रक्त सना खान आणि अमित साहू यांच्या व्यतिरिक्त आणखी दोन व्यक्तीचे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हत्येची घटना घडली, तेव्हा त्या घरी तेव्हा आणखी कोणी उपस्थित होते  असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, दोन ऑगस्टच्या सकाळी अमित साहू याने सना खान यांची बेसबॉल बॅट ने वार करून हत्या केल्यानंतर सना खान यांचे मृतदेह हिरण नदीत फेकून दिले होते. मात्र त्यापूर्वी अमित साहू यांच्या घरी आलेल्या एका मोलकरीणने सना खान यांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आणि कार्पेट मध्ये गुंडाळलेले मृतदेह पाहिले होते. तेव्हापासून ही मोलकरी अचानकपणे बेपत्ता झाली होती. दोन दिवसांपूर्वी नागपूर पोलिसांना ती महिला सापडली असून तिला जबलपूर मधून नागपूरात आणण्यात आले आहे.


भाजप नेत्या सना खान हत्या प्रकरणाला नवं वळण