बातम्या
मनोज जरांगेच्या वक्तव्यावर भाजप नेते चांगलेच आक्रमक
By nisha patil - 7/24/2024 11:17:42 PM
Share This News:
राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर याच मुद्द्यावरून आता राज्याचे राजकारण देखील ढवळून निघाले आहे. अशातच आज मनोज जरांगे पाटील यानी आपले उपोषण स्थगित घेत सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. सोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील यावेळी गंभीर आरोप केले आहे. याच मुद्यावरून आता भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहे. अशातच आता भाजपचे नेते आणि आमदार डॉ. परिणय फुके यांनी मोठं वक्तव्य करत मनोज जरांगे यांच्यावरही टीका केली आहे.
मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण कोणीही देऊ शकत नाही आणि कोणी ते देण्याची हिंमतही करणार नाही. राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, हा कोणाचाही अधिकार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने कोणत्या समाजाला कोणत्या प्रवर्गातून आरक्षण द्यायचं, हे आधीपासून ठरवलेलं आहे. आता याच्यावर कोणताही समाज ओबीसी, एससी किंवा एसटीमध्ये दाखल करता येणार नाही. निश्चितच मनोज जरांगे यांनी पुन्हा कायदा आणि संविधानाचा अभ्यास करून घेतला पाहिजे, असे स्पष्ट मत डॉ. परीणय फुके यांनी व्यक्त करत मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाबाबत करताना त्यांच्यावर टीका केली.
मनोज जरांगेच्या वक्तव्यावर भाजप नेते चांगलेच आक्रमक
|