बातम्या

भाजपचा संजय मंडलिक यांना जाहीर पाठिंबा

BJP publicly supports Sanjay Mandalik


By nisha patil - 3/29/2024 7:13:53 PM
Share This News:



सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचा पडघम वाजत असून, सर्व पक्ष आपल्या तयारीला लागले आहेत. महायुतीने काल कोल्हापुरातून आपले दोन उमेदवार जाहीर केले. यामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार संजय मंडलिक व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.

याच पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यांनी बैठक घेतली. यामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी एकमताने कोल्हापूर विद्यमान खासदार संजय मंडलिक व हातकलंगले विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना आपला जाहीर पाठिंबा दर्शवला.  
    यावेळी राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, शाहू मिल अध्यक्ष समरजीतसिंह घाडगे, माजी आमदार अमल महाडिक, अध्यक्ष विजय जाधव, महेश जाधव व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते


भाजपचा संजय मंडलिक यांना जाहीर पाठिंबा