बातम्या

एक एक फोडण्यापेक्षा भाजपने निवडणुका घ्याव्यात

BJP should hold elections instead of breaking one by one


By nisha patil - 7/29/2023 5:29:14 PM
Share This News:



 उद्धव ठाकरेंचे शिंदे -फडणवीस -पवार सरकारला आव्हान

 मुंबई महानगरपालिकेतील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि माजी शिक्षण समिती सभापती मंगेश सातमकर यांच्या शिंदे गटात  झालेल्या प्रवेशानंतर आज या मतदारसंघातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत शिंदे गटावर आणि भाजपवर टीका केली. एक एक जण फोडण्यापेक्षा भाजपने निवडणुका घ्याव्यात, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी केले आहे. 
       याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले , मी मागेच सांगितले होते की ज्यांना जायचे आहे त्यांना जाऊद्यात. कोणी गेल्यानंतर आपल्या सागराला उधाण येत आहे. मग ते रागाचे आहे, जिद्दीचे आहे, द्वेषाचे आहे, जिंकण्याची ईर्ष्या आणखी वाढत आहे, त्यामुळे जे गेले आहेत त्यांना जय महाराष्ट्र. आता त्यांचा आणि आपला संबंध तुटला, असा टोला त्यांनी सातमकर यांनी शिंदे गटाच्या प्रवेशावरून लगावला आहे. तसेच, कोणत्याही परिस्थिती आपले बालेकिल्ले आपल्याला राखायचे आहेत. कोणाच्या जाण्याने आपला धक्का बसत नाहीये. उलट त्यांना धक्का बसतोय कारण इतकं काही होऊन पण शिवसेना संपत नाही. याची त्यांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे असे एक एक फोडण्यापेक्षा निवडणुका घ्या, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी सरकारला केले आहे.
         दरम्यान सत्ताधाऱ्यांच्या एकजुटीवर टीका करत उद्धव ठाकरे  म्हटले की, पाच वर्षानंतर कळले की एनडीए  नावाचा अमिबा जिवंत आहे. कारण अमिबामध्ये पण एकच पेशी असते, त्यामुळे तो वाकडा तिकडा असतो, असा टोला देखील उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.


एक एक फोडण्यापेक्षा भाजपने निवडणुका घ्याव्यात