बातम्या
कोल्हापुरात काळा चहा पिऊन भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा निषेध
By nisha patil - 9/25/2023 5:41:39 PM
Share This News:
राज्यातील पत्रकारांनी 2024 च्या निवडणुकीपर्यंत आपल्या विरोधात बातम्या देऊ नयेत, यासाठी पत्रकारांना चहाला घेऊन जावा, त्यांना धाब्यावर घेऊन जावा, चहाला घेऊन जावा म्हणजे तुम्हाला समजलचं असेल असं वक्तव्य करून अकलेचे तारे तोडणारे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात कोल्हापुरातील पत्रकारांनी एकत्र जमत काळा चहा पिऊन या वक्तव्याचा निषेध केला, तर कोल्हापुरात आल्यावर कोल्हापुरी पायतानाचा हिसका दाखवू असा इशाराही दिला आहे. कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने या निषेध सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या या वक्तव्याचे पडसाद आज राज्यभर उमटत असून कोल्हापुरातील पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या कोल्हापूर प्रेसवरच्यावतीने या वक्तव्याचा निषेध नोंदवत पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन यांनी काळा चहा पिऊन या वक्तव्याचा निषेध नोंदवला. येत्या पाच आणि सहा ऑक्टोबर रोजी बावनकुळे कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत तेव्हा त्यांना कोल्हापुरी पायतानाचा हिसका दाखवू असा इशारा अध्यक्ष शितल धनवडे यांनी दिला
कोल्हापुरात काळा चहा पिऊन भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा निषेध
|