बातम्या

कुख्यात गुंड गजानन मारणेसोबत भाजपचे कनेक्शन...

BJPs connection with killing notorious gangster Gajanan


By nisha patil - 8/29/2024 2:49:01 PM
Share This News:



  राष्ट्रवादी आणि गजानन मारणे प्रकरण शांत होत नाही तोच भाजप नेते अन् मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार गजानन मारणे याने केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप टीका होऊ लागली आहे. यापूर्वी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा सत्कार गजानन मारणे याने केला होतो. त्यानंतर शरद पवार गटातील खासदार निलेश लंके याचाही सत्कार गजा मारणे याने केला होतो. त्यावेळी भाजपने निलेश लंके यांच्यावर टीका केली होती.अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे उर्फ गजा मारणे कनेक्शन समोर आला आहे.
   

चंद्रकांत पाटील कोथरूडचे आमदार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा कोथरूडमधून निवडणूक लढवण्याची तयारी चंद्रकांत पाटील यांनी सुरू केली आहे. यापूर्वी या गुंडासोबत भाजपचेही कनेक्शन समोर आल्याने विरोधकांना टीका करण्याची संधी मिळाली आहे. 
     

या प्रकारानंतर काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर हल्ला केला आहे. त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील आणि गुंड गजानन मारणे यांच्या व्हिडिओ एक्सवर शेअर केला. त्यात ‘लाडके गुंड’ असे कॅप्शन दिले आहे. मंत्री महोदयांनी पुष्पगुच्छ स्वीकारून गजानन मारणेला हात जोडले, असा चिमटा काँग्रेसने काढला आहे.


कुख्यात गुंड गजानन मारणेसोबत भाजपचे कनेक्शन...