बातम्या
विवेकानंद कॉलेजमधील बी.व्होक. ॲनिमेशन ॲन्ड् फिल्म मेकींग
By nisha patil - 12/18/2024 3:33:16 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमधील बी.व्होक. ॲनिमेशन ॲन्ड् फिल्म मेकींग
पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मुंबईच्या कंपनीमध्ये प्लेसमेंट
कोल्हापूर : येथील विवेकानंद महाविद्यालयाच्या बी.व्होक. ॲनिमेशन अँड फिल्म् मेकींग पदवी अभ्यासक्रमामध्ये शिकत असणाऱ्या एकूण पाच विद्यार्थ्यांची मुंबईच्या डायलॉग्ज् मेडिया या कंपनीमध्ये स्क्रीप्ट् रायटींग व सिनेमॅटोग्राफी या पदासाठी निवड झाली आहे. सदर विद्यार्थ्यांना पाच लाख रुपयाचे पॅकेज जाहीर झाले आहे. या विद्यार्थ्यांना बी.व्होक. ॲनिमेशनचे शिक्षण घेतानाच नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. सदर विद्यार्थ्यांची नांवे खालीलप्रमाणे आहेत.
1) दिग्वीजय पाटील 2) कु. कामया खातिब 3) कु. संहिता मोरे 4) कु. ऋचा बराडे 5)सुमित इंगळे
या सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी अभिनंदन केले असून त्यांना बी.व्होक. विभागाच्या नोडल ऑफिसर डॉ. श्रुती जोशी व विभागप्रमुख प्रा. महेश माळी, प्रा. निखिल शिंगे, प्रा.अतुल पाटील, प्रा.अनिकेत कोरे , महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री. आर. बी. जोग यांचे मार्गदर्शन लाभले.
विवेकानंद कॉलेजमधील बी.व्होक. ॲनिमेशन ॲन्ड् फिल्म मेकींग
|