बातम्या

बाहुबली मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात संपन

Baahubali ends Gurupurnima with excitement


By nisha patil - 3/7/2023 10:46:55 PM
Share This News:



कुंभोज वार्ताहर-( विनोद शिंगे)  एम जी शहा विद्यामंदिर व जुनिअर कॉलेज बाहुबली मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात संपन सुरुवातीस विद्यार्थिनींनी मंगलाचरण गायिले.यावेळी प्रमुख मान्यवरांनी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन केले. स्वागत व प्रास्ताविक अध्यापक श्रीपाल तामगावे यांनी केले. यावेळी १९९० च्या बॅचच्या विद्यार्थ्याकडून गुरुदक्षिणा म्हणून शाळेस स्मार्ट बोर्ड करिता एक लाख ४१ हजार रुपयांची दानराशी दिली. यावेळी अभयकुमार मगदूम, नेमगोंडा पाटील, उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे ,सुरेश आवटी ,अर्जुन दळवी इत्यादी माजी विद्यार्थी उपस्थित होते. पाचवीच्या विद्यार्थ्यांनी यावेळी अध्यापकांचे पादपूजन करून त्यांचा सन्मान केला. विद्यार्थी मनोगत पूर्वा नरबळ व सृष्टी खोत यांनी केले तर अध्यापक मनोगत अध्यापिका वैशाली पाटील यांनी केले. अध्यक्षीय मनोगत गोमटेश बेडगे यांनी केले. 
           पाचवीच्या अध्यापकांनी यावेळी वृक्षारोपणासाठी शाळेस वृक्ष भेट दिले. ग्रंथपाल दीपक चौगुले यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्याध्यापक गोमटेश बेडगे यांना ग्रंथ भेट दिले. आभार भैरू बागडी यांनी मानले तर सूत्रसंचालन अश्विनी पाटील यांनी केले.


बाहुबली मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात संपन