बातम्या

बाहुबली चा शाळा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Baahubalis school anniversary is celebrated with enthusiasm


By nisha patil - 12/7/2023 6:03:59 PM
Share This News:



कुंभोज प्रतिनिधी(विनोद शिंगे) श्री बाहुबली विद्यापीठ बाहुबली,संचलित बालविकास व प्राथमिक विद्यामंदिर बाहुबली येथे प्रशालेचा 21 वा वर्धापन दिन बुधवार दि. 12जुलै 2023 रोजी अतिशय उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे अध्यक्ष मा.श्री तात्यासो अथणे सर , बाहुबली विद्यापीठ बाहुबली चे संचालक मा.श्री गोमटेश बेडगे सर, प्रमुख अतिथी टेक्निकल विभाग प्रमुख एम.जी शहा विद्यामंदिर, बाहुबली चे रवींद्र देसाई सर, तसेच एम.जी.शहा विद्यामंदिरचे अध्यापक मा.श्री शरद जुगळे सर तसेच पालक वर्ग उपस्थित होते.
       

स्वागत प्रास्ताविकेत मुख्याध्यापिका सौ. सुनीता पाटील यांनी शाळेच्या इतिहासातील चमकता तारा म्हणजे शाळेचे गुणवंत विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांकडून प्रेरणा आताच्या सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावी असे प्रतिपादन केले. शाळा वर्धापन दिनानिमित्त प्रशालेचा पहिल्या वर्षीचा विद्यार्थी अजय सुरेश पाटील हा यावर्षी सी.ए.परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्यांनी सी.ए. पदवी मिळवली म्हणून त्याचाही व त्याच्या पालकांचाही सन्मान करण्यात आला.
 

यावर्षी 10 वी व 12 वी परीक्षेत उत्तीर्ण झालेले प्रशालेचे माजी गुणवंत विद्यार्थी यांचाही सत्कार करण्यात आला.सांगली शिक्षण संस्थेच्या टि.एस.ई.या स्पर्धेत केद्रात इ.2 री ची प्रचिता पाटील व इ.3री तील केवल रोटे या विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळविल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
माजी पालक सुरेश पाटील सरांनी इमारतीचा पाया जसा भक्कम असावा लागतो तसेच विद्यार्थ्यांचाही जर प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम झाला तरच ते पुढील जीवनात यश मिळवू शकतात असे सांगितले. तसेच प्रशालेतील आजी व माजी विद्यार्थ्यांनीही शाळेविषयीचे मनोगत व्यक्त केले. शाळेविषयी अध्यापिका मनोगत सौ.अनिता कागवाडे यांनी व्यक्त केले.विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.पूनम लांडे तर आभार सौ. माधुरी मगदूम यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व अध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहाय्य लाभले.


बाहुबली चा शाळा वर्धापन दिन उत्साहात साजरा