बातम्या

कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभा करावा अशी जनते कडून विनंती

Babasaheb Ambedkar


By nisha patil - 12/28/2023 6:11:31 PM
Share This News:



कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभा करावा अशी जनते कडून विनंती 

आम्ही आंबेडकरी समाज पक्ष संघटना आणि तमाम जनतेच्या वतीने आपणास निवेदन करतो की, २६ नोव्हेंबर २०१३ रोजी सुप्रिम कोर्टाचे सरन्यायाधिश मान. डी. वाय. चंद्रचूड़ साहेब यांच्या पुढाकारने सुप्रिम कोर्टाच्या आवारात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वकिली पोषाखालील पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. व या पुतळ्याचे उद्घाटन भारताचे राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मी यांच्या हस्ते करण्यात आले. अगदी त्याच धर्तीवर कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वकिली पोषाखातील पूर्णाकृती पुतळा उभा करण्यात यावा.

तसे पाहिले तर अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाने २० वर्षा पूर्वीच आपल्या प्रवेशद्वारावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा केला असून त्याला ज्ञानाचे प्रतिक म्हणून घोषीत केले आहे. त्या विद्यापीठाचा कित्ता गिरवत जपान, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, इंग्लड आशा जगभरातील अनेक विद्यापीठांनी ज्ञानाचे प्रतिक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे उभारले आहेत. ज्ञानाचे प्रतीक म्हणून डॉ. बाबासाहेब आबेडकर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातृभूमीत सुप्रीम कोर्टाच्या आवारात कायदेपंडित म्हणून उभारलेला पुतळा भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. मात्र या ऐतिहासिक घटनेला तशा उशीरच झाला असला तरी सप्रिम कोटनि सकारात्मक पाऊल उचलले आहे. यापुढे जाऊन प्रत्येक कोर्टाच्या आवारात कायदेपंडीत म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला गेला पाहिजे अशी सर्वच न्यायप्रिय संविधानवादी जनतेची अपेक्षा आहे.

कोल्हापूरचे राजे छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वैचारिक नाते किती मजबूत होते हे सर्वज्ञात आहे. १९२० साली झालेल्या ऐतिहासिक माणगांव परिषदेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ अस्पृश्याचे नेते नाहीत तर ते पुढे संपूर्ण भारताचे पुढारी होतील असे भाकीत शाह राजांनी केले होते. कोल्हापूरच्या या राजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची हत्तीवरून मिरवणूक काढली आणि विद्वतेच्या राजाचा यथोचित सन्मान केला. तर छत्रपती शाहू महाराज यांचे शिष्य असलेले मराठा नेते भाई माधवराव बागल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत जगातील पहिला अर्ध पुतळा ऐतिहासिक बिंदू चौक येथे बसविला आहे. त्याच करवीर नगरीत जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात कागदे पंडित म्हणून वकिली पोषाखालील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करावा व त्यांच्या देशसेवेचा, त्यागाचा आणि विद्वतेचा सन्मान करावा अशी सर्व जनतेच्या वतीने विनंती आहे.


कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभा करावा अशी जनते कडून विनंती