बातम्या

तारक मेहता' मधील बबिताचा दिलखेच अदांनी जिंकलं अनेकांचं मन

Babitas adorable performance in Tarak Mehta won the hearts of many


By nisha patil - 12/16/2023 5:05:42 PM
Share This News:



टीव्हीचा लोकप्रिय कॉमेडी शो 'तारक मेहता' यामध्ये दिसणारी बबिता इंस्टाग्राम अकाऊंटवर मालदीव मधील काही मनमोहक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती बीचवर पोज देताना दिसत आहे.या फोटोंमध्ये मुनमुन दत्ता बहुरंगी डीपनेक ड्रेस परिधान करून किलर पोझ देताना दिसत आहे.अभिनेत्रीने बोल्ड मेकअप, गडद लिपस्टिक आणि मोकळे केस ठेवत सुंदर बीच लूक केला आहे. तिचे हे फोटो पाहून चाहत्यांनी देखील कमेंट्सचा वर्षाव केला.मुनमुन दत्ता तिच्या कामासोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. अभिनेत्री दररोज तिचे हॉट फोटो शेअर करून मुलांच्या हृदयाचा पारा वाढवत असते.मालदीवचे फोटो शेअर करताना मुनमुनने लिहिलं की, 'मनाच्या शांती आणि आनंदासाठी विश्रांती घेणं, फ्रेश होणं आणि जीवनाच्या गजबजाटातून बाहेर पडणं नेहमीच महत्त्वाचं असतं.'मुनमुन दत्ता गेल्या १५ वर्षांपासून 'तारक मेहता'सोबत जोडली गेली आहे. या शोमध्ये ती 'बबिता जी' ची भूमिका साकारत आहे, जी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.मुनमुन दत्ताने 2005 मध्ये टीव्हीच्या दुनियेत प्रवेश केला होता. तेव्हापासून आजपर्यंत अभिनेत्री आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मनं जिंकत आहे.तिच्या सीरियलसह तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते.प्रत्येक घराघरात मुनमुन बबिता जी या नावाने ओळखली जाते. मुनमुन मालदीवमध्ये बिनधास्तपणे वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे.अभिनेत्रीचे चाहते तिच्या एका झलकेसाठी आतुर असतात.


तारक मेहता' मधील बबिताचा दिलखेच अदांनी जिंकलं अनेकांचं मन