बातम्या

सदर बाजार कत्तलखाण्याची दुरावस्था - आप कडून अधिकारी धारेवर - संदीप देसाई

Bad condition of sadar bazaar slaughterhouse  AAP on official line   Sandeep Desai


By nisha patil - 4/3/2024 4:31:57 PM
Share This News:



सदर बाजार कत्तलखाण्याची दुरावस्था -

 आप कडून अधिकारी धारेवर -  संदीप देसाई

दोन दिवसांत स्वच्छता केली नाही तर संबधितांचे निलंबन करा 

सदर बाजार येथील कत्तलखाण्यात जनावरांचे मटण विक्रीसाठी ठेवले जाते. कत्तलखाण्यास गेट नसल्याने या परिसरात कुत्र्यांचा मुक्त वावर आहे. गेले अनेक महिने येथे स्वच्छता होत नसल्याची तक्रार येथील व्यापारी व परिसरातील नागरिक करत होते. परंतु याची दखल घेतली जात नव्हती. आज आम आदमी पार्टीने यावर निदर्शने करत प्रशासनाचे लक्ष वेधले.

कनिष्ठ अभियंता उमेश बागुल व आरोग्य निरीक्षक करण लाटवडे यांना कत्तलखाण्याची दुरावस्था आप पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिली. "अस्वच्छतेमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. संबंधित आरोग्य निरीक्षक अनिकेत सूर्यवंशी सुट्टीवर असल्याचे कारण देत टाळाटाळ करू नये, येत्या दोन दिवसात स्वच्छता झाली नाही तर त्यांचे निलंबन करा" अशी मागणी शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी केली.

गेटच्या कामाचा प्रस्ताव पाठवला आहे. हे काम बजेट अभावी थांबले होते. परंतु ते प्रधान्याने घेऊ असे आश्वासन अभियंता बागुल यांनी दिले. शहर संघटक विजय हेगडे यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले.
महासचिव अभिजित कांबळे, समीर लतीफ, मोईन मोकाशी, मयूर भोसले, अमरसिंह दळवी, रमेश कोळी, लखन मोहिते, स्थानिक व्यापारी व नागरिक उपस्थित होते.


सदर बाजार कत्तलखाण्याची दुरावस्था - आप कडून अधिकारी धारेवर - संदीप देसाई