बातम्या
विशाळगड हिंसाचार प्रकरणातील १७ आरोपींचा जामीन मंजूर .
By nisha patil - 6/8/2024 7:07:28 PM
Share This News:
१४ जुलै रोजी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुकारलेल्या विशाळगड अतिक्रमणमुक्ती आंदोलनाने हिंसक वळण घेतलं होतं . यावेळी संतप्त जमावाने विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर परिसरात घरे, दुकानांसह मशिदीला लक्ष्य करत प्रचंड दगडफेक केली होती. या प्रकरणी शाहूवाडी पोलिसांनी एकूण पाच गुन्हे नोंदवले होते. तर २४ जणांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी आज आरोपींच्या जामिनावर जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली . या सुनावनीत न्यायालयाने १७ आरोपीचा सशर्त जमीन मंजूर केला. तर ७ जणांचा जमीन रद्द करण्यात आला आहे . .
विशाळगड हिंसाचार प्रकरणातील १७ आरोपींचा जामीन मंजूर .
|