विशेष बातम्या

संत सोपानकाका पालखी प्रस्थानावेळी भर उन्हात सुप्रिया सुळेंनी घातली फुगडी

Balloons placed by Supriya Sule in the hot sun during the departure of Saint Sopankaka Palkhi


By nisha patil - 6/16/2023 7:40:38 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम  संत सोपानकाका पालखीत भर ऊन्हात सुप्रिया सुळेंनी फुगडी घातली.संत ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू श्री संत सोपानकाका महाराजांचा पालखीचे आज प्रस्थान झाले.यावेळी खासदार सुप्रिया सुळेंनी हजेरी लावली होती.दुपारी 1 वाजता सासवड येथील मंदिरातून म्हणजेच देऊळ वाड्यातून पालखी बाहेर पडली.14 दिवस प्रवास करून हा सोहळा 28 जूनला पंढरपूरमध्ये पोहोचेल.मंदिरात काही काळ भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर संत सोपानकाकांच्या पादुका असलेली पालखी उत्तर दरवाजातून बाहेर पडली.पालखीच दर्शन घेण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.सुप्रिया सुळे यांना वारकऱ्यांसोबत फुगडी खेळण्याचा मोह आवरला नाही.सोपानकाका महाराजांच्या पादुकांवर नतमस्तक झाल्या.
 


संत सोपानकाका पालखी प्रस्थानावेळी भर उन्हात सुप्रिया सुळेंनी घातली फुगडी