बातम्या
शहरातील नवीन रस्ते खोदण्यास दोन वर्ष बंदी
By nisha patil - 10/20/2023 4:16:56 PM
Share This News:
शहरातील नवीन रस्ते खोदण्यास दोन वर्ष बंदी
एक नोव्हेंबर पर्यंत खोदाई करून घ्यावे
असे आव्हान शहर अभियंता हर्षजीत घाडगे यांनी
शहरात नव्याने केलेले रस्ते काही कामानिमित्त खोदले जातात एका ठिकाणी खुदाई झाल्याने काही दिवसातच सर्व रस्त्याची चाळण होते त्यामुळे महानगरपालिकेने आता एकदा रस्ता केल्यानंतर दोन वर्ष त्या रस्त्यावर कोणत्याही प्रकारच्या खुदाईला परवानगी दिली जाणार नसल्याची माहिती शहर अभियंता हर्षजीत घाडगे यांनी दिली
एक आक्टोंबर पासून शहरात नव्याने रस्ते करण्याच्या कामाला सुरुवात होणार असून 31 ऑक्टोबर पर्यंत गळती काढणे ड्रेनेज लाईन बदलणे नवीन पाणी कनेक्शन सर्व कामे करून घेण्यास मुदत दिली आहे सर अभियंता घाडगे म्हणाले महानगरपालिकेकडून रस्ते झाल्यानंतर काही दिवसातच पाणीपुरवठा विभाग गळती काढण्यासाठी रस्त्याची खोदाई करतो तर काही ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी रस्त्याची खुदाई होते तर नागरिक ही नवीन पाणी कनेक्शन साठी रस्ते खोततात अशा कारणामुळे नवीन केलेले रस्ते खराब होत आहेत यामुळे महानगरपालिका प्रशासनाने आता क** भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे एकदा रस्ता केल्यानंतर पुढील दोन वर्ष खुदाईसाठी परवानगी दिली जाणार नाही रस्ते करण्यापूर्वी संबंधितांनी कामे करून घेतलीत पाहिजेत
शहरातील नवीन रस्ते खोदण्यास दोन वर्ष बंदी
|