बातम्या

विसर्जन मिरवणुकीत रात्री बारानंतर वाद्य वाजवण्यास बंदी

Ban on playing musical instruments after 12 midnight in immersion processions


By nisha patil - 9/26/2023 7:10:54 PM
Share This News:



गणपती विसर्जनाच्या दिवशी मध्यरात्री बारानंतर नियमातील साउंड सिस्टीम आणि पारंपरिक वाद्यांनावर बंदी घालण्यात आली आहे. याबाबतची माहिती कोल्हापूर शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी दिली आहे. त्यामुळे गणपती विसर्जन मिरवणुकी वेळी मध्यरात्री 12 नंतर शांतता राहणार आहे.मुख्य म्हणजे, यामुळे आता गणेशभक्तांना पुढील तीन दिवसच रात्री बारापर्यंत साऊंड स्पीकरचा वापर करता येणार आहे. त्याचबरोबर, गणपती विसर्जन मिरवणुकीवेळी सुद्धा आवाजाची मर्यादा आणि वेळ पाळावी लागणार आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास शहर पोलिसांकडून संबंधित मंडळांवर गुन्हा दाखल केला जाईल. तसेच, साऊंड सिस्टिमच्या मालकावर देखील कारवाई केली जाईल. त्यामुळे यावर्षीच्या गणेश विसर्जनावेळी शांतता राहणार आहे.


विसर्जन मिरवणुकीत रात्री बारानंतर वाद्य वाजवण्यास बंदी