बातम्या

10 वी 12 वी परीक्षा केंद्रांच्या, उपकेंद्रांच्या 100 मीटर परिसरात इलेक्ट्रॉनिक वस्तू बाळगण्यास बंदी

Ban on possession of electronic items within 100 meters of 10th and 12th examination centers


By nisha patil - 7/2/2025 2:03:26 PM
Share This News:



10 वी 12 वी परीक्षा केंद्रांच्या, उपकेंद्रांच्या 100 मीटर परिसरात इलेक्ट्रॉनिक वस्तू बाळगण्यास बंदी

कोल्हापूर,  : जिल्ह्यात उच्च माध्यमिक (इयत्ता 12 वी) 74 परीक्षा केंद्रे व माध्यमिक शालांत (इयत्ता 10 वी) 138 परीक्षा केंद्रे असून परिक्षेचे कामकाज सुयोग्य पध्दतीने तसेच कॉपीमुक्त होण्यासाठी परीक्षा केंद्राच्या आवारात, परिसरात शांतता, तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता ज्या ठिकाणी उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत परीक्षा घेण्यात येणार आहेत 

अशा परीक्षा केंद्रांच्या, उपकेंद्रांच्या 100 मीटर परिसरात दि. 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या परीक्षा कालावधीत (ज्या दिवशी परीक्षेचे पेपर नसतील ते दिवस वगळून) दररोज सकाळी 7 वाजल्या पासून ते सायं. 6 वाजेपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये परीक्षा केंद्रांच्या, उपकेंद्रांच्या 100 मीटर परिसरात मोबाईल फोन जवळ बाळगणे, त्या संबंधी इलेक्ट्रॉनिक साहित्य बाळगण्यास, वापरण्यास, झेरॉक्स मशिन, फॅक्स मशिन व लॅपटॉप यांचा वापर करण्यास अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी बंदी घातली आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र राहतील. हा बंदी आदेश परीक्षेचे कामकाजासाठी नेमलेले अधिकारी व कर्मचारी यांना, त्यांना नेमून दिलेल्या परिक्षेच्या कामकाजासाठी हाताळाव्या लागणाऱ्या उपकरणासाठी लागू राहणार नाही, असेही या आदेशात नमुद आहे.


10 वी 12 वी परीक्षा केंद्रांच्या, उपकेंद्रांच्या 100 मीटर परिसरात इलेक्ट्रॉनिक वस्तू बाळगण्यास बंदी
Total Views: 66